Home Blog Agro Tourism ‘नेचर्स ब्लिस ‘ कृषीपर्यटन केंद्र
‘नेचर्स ब्लिस ‘ कृषीपर्यटन केंद्र

‘नेचर्स ब्लिस ‘ कृषीपर्यटन केंद्र

श्री राहुल निलकंठराव देशमुख यांनी साकारलेले ‘नेचर्स ब्लिस ‘ हे कृषी पर्यटन केंद्र कारंजा लाड तालुक्यात ‘मनभा’ या गावी कार्यरत आहे .
कृषी पर्यटन केंद्र म्हणजे असे ठिकाण जेथे निसर्गरम्य वातावरणासोबतच शैक्षणिक माहिती, लुप्त पावलेल्या गोष्टी, तसेच खेड्यातील जीवनाचा आस्वाद घ्यायला मिळतो.
‘नेचर्स ब्लिस्’ कृषी पर्यटन केंद्र त्यापैकीच एक आहे.
यामागील आमचा उद्देश म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून गावाकडील जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे हा आहे.
सध्या देशमुख यांच्या कृषी पर्यटन केंद्रात २०० प्रकारची ७५०० झाडे आहेत ज्यात दुर्मिळ आणि औषधी वनस्पती आहेत. तसेच आल्हाददायक निसर्गासोबतच ,बैलगाडीची सफारी,लहान मुलांचे खेळ (विटीदांडू,भोवरा,लगोरी इ.) अशा अनेक गोष्टींबरोबरच राहण्याची उत्तम सोय, व अस्सल वऱ्हाडी जेवण असा संपूर्ण खेड्याचा अनुभव याठिकाणी मिळतो.
अशा निसर्गरम्य ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.
*आमची आकर्षणे *
*जलतरण तलाव व रेनडान्स
*कराओके गायन सुविधा
*बंगला,टेन्ट व मॉर्डन शौचालय
*फूड प्रोसेसिंग युनिट
*फ्लोटिंग हॉल व मातीच्या रूम्स
*सेंद्रिय शेती व बांबूची बाग
*टॉकिंग ट्री अँप द्वारे बोलणारी झाडे


अधिक माहितीसाठी https://agrotrip.in/listing/natures-bliss-agrotourism-center/ ला भेट द्या

Add comment

Sign up to receive the latest
updates and news